Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकच वार, सारे गार! नीरज चोप्राने पहिल्याच भालाफेकीत फायनलमध्ये मारली धडक

एकच वार, सारे गार! 
नीरज चोप्राने पहिल्याच भालाफेकीत फायनलमध्ये मारली धडक



पॅरिस : खरा पंचनामा

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील मंगळवारी ११ व्या दिवसाचे खेळ खेळले जात आहेत. आता मंगळवारी भारताचं सर्वात मोठं आशास्थान असलेला नीरज चोप्रा मैदानात उतरला आहे. मंगळवारी पुरुषांच्या भालाफेकीची क्वालिफायर्स खेळवण्यात आली.

या क्वालिफायर्समध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा समावेश बी ग्रुपमध्ये करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये त्यानेच सर्वात पहिल्यांदा भाला फेकला. यावेळी त्याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८९.३४ मीटर अंतरावर भाला फेकला आणि अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. विशेष म्हणजे याआधी झालेल्या ए ग्रुपमधील क्वालिफायर्समधील १६ खेळाडूंपेक्षाही नीरजचे अंतर सर्वोत्तम ठरले आहे. ए ग्रुपमध्ये अव्वल क्रमांकावर जर्मनीचा ज्युलियन वेबर राहिला होता. त्याने ८७.७६ मीटर भाला फेकला होता.

दरम्यान, अ ग्रुपमध्ये भारताचा किशोर जेना होता. मात्र तो या ग्रुपमध्ये ९ व्या क्रमांकावर राहिला. त्याने सर्वोत्तम ८०.७३ मीटर भाला फेकला. त्यामुळे त्याचं या स्पर्धेतील आव्हान संपले. त्यानेही ही भालाफेक पहिल्या प्रयत्नात केली होती. दुसऱ्या प्रयत्न त्याचा अपयशी ठरला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.