भुरट्या चोरापासून सगळे देवेंद्र फडणवीसकडेच आहेत
मनोज जरांगे यांचा सांगलीत आरोप
सांगली : खरा पंचनामा
"सगळ्या पक्षातले लोक हारलेत कारण मी त्यांना मॅनेज होत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मला नोटीसच पाठवले. मला माहिती कळली. 'एसआयटी'पण आहे माझ्या मागे. छगन भुजबळ च्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले. भुरट्या चोरापासून सगळे देवेंद्र फडणवीस कडेच आहेत. सगळे भुरटेच माझ्या मागे लावले," असा आरोप मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगली येथील सभेत केला.
जरांगे म्हणाले, "तुम्हाला तुमचा पक्ष मोठा करायचा आहे पण मला माझ्या मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे आहेत. मी काय चूक केली मी आरक्षणाचा मागत आहे ना माझी जात मोठी करत आहे. आता जातीला बाप मानायचं शिका. नेत्याला बाप करू नका," असेही जरांगे म्हणाले.
ते म्हणाले, "मराठ्यांनी केलेले सगळे आमदार आहेत हे. मागच्या दारांनी झालेले हे आमदार आहेत. मुंबईला चक्कर मारून येऊ लय वळवळ करत आहेत. 29 ऑगस्टला सगळ्यांनी यायचे. याना लय मस्ती आली आहे. त्यामुळे मी ठरवलं आहे माझी शक्ती वाढवायची आहे."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.