Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत गांजा विक्रीसाठी आलेल्या जयसिंगपूरच्या तरूणासह दोघांना अटक दुचाकीसह ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई

सांगलीत गांजा विक्रीसाठी आलेल्या जयसिंगपूरच्या तरूणासह दोघांना अटक
दुचाकीसह ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

धामणी रस्ता परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या जयसिंगपूर येथील तरूणासह दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक दुचाकी, ४ किलो गांजा असा ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगलीतील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.  
 
राहुल संतोष घाडगे (वय २२, रा. धरणगुती, जयसिंगपूर), सॅम्युअल प्रकाश कांबळे (वय २३, रा. धामणी, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सांगलीचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी विश्रामबाग पोलिसांनी दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक अशा गुन्हेगारांच्या शोधात होते. त्यावेळी दोन तरूण धामणी रस्ता परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील आर्यन देशिंगकर यांना मिळाली. 

पथकाने धामणी रस्ता परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी तेथील पाण्याच्या टाकीजवळ दोन तरूण दुचाकी घेऊन संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसून आले. पथकाने त्यांची तपासणी करून त्यांच्याकडील पोत्याची तपासणी केल्यावर त्यामध्ये चार किलो गांजा आढळून आला. याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गांजा विक्रीसाठी आल्याची कबुली दिली. मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. 

सांगलीचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाने विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे, उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, निवास कांबळे, संदीप साळुंखे, बिरोबा नरळे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, संकेत कानडे, योगेश पाटील, पूजा जगदाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.