Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पैशाचा पाऊस पाडतो म्हणून तेरा लाखांना गंडा बडतर्फ पोलिस, दोन महाराजांसह सात जणांवर गुन्हा

पैशाचा पाऊस पाडतो म्हणून तेरा लाखांना गंडा 
बडतर्फ पोलिस, दोन महाराजांसह सात जणांवर गुन्हा



मंगळवेढा : खरा पंचनामा

पैशांचा पाऊस पडतो असे आमिष दाखवून श्रीपूर येथील एकाला १२ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घोलपवाडी (ता. इंदापूर) येथील गावाच्या हद्दीत घडली यासंदर्भात वालचंदनगर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे

सतीश कृष्णा मांडवे (रा. श्रीपूर ता. माळशिरस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम लक्ष्मण भागवत (रा घोलपवाडी ता, इंदापूर), काळू रोहिदास (रा जांभूड ता माळशिरस), श्रीकृष्ण खुडे (रा बोरगाव तालुका माळशिरस) व दोन अनोळखी महाराज,

एक अनोळखी महिला व एक पुरुष अशा सात जणांवर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

१० जून ते १७ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये घोलपवाडी गावाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. उत्तम भागवत यांनी सतीश मांडवे श्रीपूर यांना पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले तसेच तुझ्या सर्व अडचणी दूर करतो असे सांगितले.

यासाठी भागवत याने घोलपवाडीत त्याच्या राहत्या घरात पूजा विधी व जादूटोणा करून प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून मांडवे यांच्याकडून रोख व ऑनलाइन १२ लाख ९८ हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.

गदादे हा बडतर्फ असतानाही बारामती येथे पोलिस असल्याची मांडवे यांना सांगितले. तसेच बारामती पोलिस ठाण्यात दाखल केलेली केस मिटवतो, म्हणून दीड लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. दरम्यान गदादे पोलिस हा बडतर्फ असल्याची माहिती सतीश मांडवे यांना मिळाली याबाबत त्यांना विचारणा केली असता गदादे यानेजीवे मारण्याची तसेच भूतबाधा करून जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. निलंबित गदादे याच्यावर वालचंद नगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.