Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना अपलोड केला घरातील बेड व रेडिओचा फोटो तहसीलदारांनी अपात्र केला अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना अपलोड केला घरातील बेड व रेडिओचा फोटो 
तहसीलदारांनी अपात्र केला अर्ज



सोलापूर : खरा पंचनामा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील चार लाख महिलांसह राज्यातील एक- दीड कोटी महिलांना १९ ऑगस्टला प्रत्येकी तीन हजार रूपये वितरीत केले जाणार आहेत. अर्ज जरी दोन-सव्वादोन कोटी अपलोड झाले असले, तरी अर्जातील त्रुटी पूतर्तेसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही.

दरम्यान, मंगळवेढ्यातील एका अर्जदाराने स्वतःचा फोटो म्हणून घरातील बेडचा तर मतदान ओळखपत्र म्हणून रेडिओचा फोटो अपलोड केल्याचे अर्ज पडताळणीवेळी समोर आले आहे.

राखीपौर्णिमेला (१९ ऑगस्ट) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने अर्जाची पडताळणी व अंतिम यादी तयार करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. तालुकास्तरीय समित्यांच्या पडताळणीत ३० ते ३५ टक्के अर्जामध्ये त्रुटी आढळल्या असून अपात्र अर्जाची संख्या फार मोठी नसल्याची स्थिती आहे. स्वतःहून अर्ज भरलेल्यांच्या मोबाईलवर नेमकी त्रुटी काय, याची माहिती देण्यात आली आहे. पण, ज्यांनी महा ई सेवा केंद्र, अंगणवाड्यांमध्ये अर्ज भरले आहेत, त्या सर्वांनाच एकाचवेळी त्रुटींची माहिती देता आलेली नाही. त्यामुळे अशा लाभार्थीसह बँक खात्याशी आधारलिंक नसलेल्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार नाही. सोमवारी जिल्हास्तरावरून अंतिम यादी शासनाला सादर केली जाणार आहे. दरम्यान, अर्ज पडताळणीवेळी अनेक अर्जामध्ये गमतीशीर बाबी आढळल्या असून ते अर्ज बाद करण्यात आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.