जगदीप धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव? विरोधक मोठं पाऊल उचलणार...
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राज्यसभेत शुक्रवारी सभापती जगदीप धनखड आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चमकम उडाली. त्यानंतर विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर विरोधी बाकावरील एकही खासदार सभागृहात उपस्थित राहिला नाही. विरोधकांकडून धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी जगदीप धनखड यांच्या बोलण्याच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरून धनखड चांगलेच भडकले आणि त्यांना मर्यादेत राहून वागण्याचा सल्ला दिला. इथेच वादाची ठिणगी पडली आणि विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत कामकाजावर बहिष्कार टाकला.
विरोधक यावरून आक्रमक झाले असून संविधानातील अनुच्छेद 67 नुसार धनखड यांच्याविरोधत महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याचे समजते. अनुच्छेद 67 नुसार उपराष्ट्रपतींना राज्यसभेतील सदस्यांच्या बहुमताने पारित आणि लोकसभेद्वारे सहमत एक प्रस्तावाद्वारे त्यांना हटवले जाऊ शकते. त्यासाठी चौदा दिवसांची नोटीस द्यावी लागले.
खासदार घनश्याम तिवारी यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे तिवारी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात होती. त्यावर बोलण्यासाठी धनखड यांनी जया अभिताभ बच्चन असे नाव उच्चारले. त्यावर जया बच्चन भडकल्या.
'मी एक अभिनेत्री आहे. बॉडी लँग्युएज, एक्सप्रेशन समजू शकते. सर, मला माफ करा, तुमचा जो टोन आहे, तो मला आवडला नाही. तुमचा टोन अस्वीकार्य आहे,' असे जया बच्चन यांनी म्हणताच धनखड भडकले. ते म्हणाले, जयाजी, तुम्ही खूप काही कमावले आहे. मी दररोज पुनर्रचार करू इच्छित नाही. दररोज तुमची शाळा घेऊ इच्छित नाही. तुम्ही माझ्या टोनवरून बोलत आहात? मी हे सहन करणार नाही. तुम्ही सेलिब्रिटी असाल, पण तुम्ही डेकोरम मानवाच लागेल, असे शब्दांत धनखड यांनी जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिले.
जया बच्चन आणि धनखड यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर विरोधकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. दादागिरी नहीं चलेगी, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सभागृहातून वॉकआऊट केले. त्याचा सत्ताधारी खासदारांनी निषेध करत निषेध प्रस्ताव सभागृहात मांडला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.