Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बदलापूरातील आंदोलनाला हिंसक वळण! शाळा फोडली, पोलिसांवर दगडफेक

बदलापूरातील आंदोलनाला हिंसक वळण! 
शाळा फोडली, पोलिसांवर दगडफेक



बदलापुर : खरा पंचनामा

बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तर संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.

चिमुकल्यांना न्याय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. बदलापूर स्थानकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे शाळेचं गेट तोडून आंदोलक आतमध्ये घुसले असून त्यांनी शाळेची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. याच आंदोलनातील काही महिलांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत. आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत. आमच्या मुलीच सुरक्षित नसतील तर आम्ही काय करावं? असा संतप्त सवाल या महिलांनी महायुती सरकारला विचारला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्काराचा प्रयत्न, पोक्सो अशी कठोर कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, असे निर्देश मी दिले आहेत. जेणेकरून पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही. तसेच संस्था चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.