जनतेला पोलिस देवासमान वाटला पाहिजे
अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर; तुरची येथे दीक्षांत संचलन समारंभ उत्साहात
सांगली ः खरा पंचनामा
प्रशिक्षणार्थी अंमलदारांनी सांघिकपणे कर्तव्य करावे. गणवेश परिधान केला की आपण समाजाचे देणे लागतो हे नेहमी लक्षात ठेवावे. महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीदवाक्य 'सद्रक्षणाय खलनिहग्रहणाय' याला शोभेल असे वतर्न ठेवावे. आपल्या कृतीने मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. कायद्याच्या चाकोरीत राहून पीडित जनतेला अशा प्रकारे मदत करावी की त्यांना पोलिस देवा समान वाटला पाहिजे, असा सल्ला अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी प्रशिक्षणार्थी अंमलदारांना दिला.
तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत संचलन समारंभ श्री. व्हटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, अनावश्यक आर्थिक गोष्टींची अपेक्षा ठेवून भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नये. आदर्श पोलिस अंमलदार म्हणून समाजाची सेवा करावी. जनतेसोबत निस्वाथीर्पणे वागणे आवश्यक आहे असेही श्री. व्हटकर यावेळी म्हणाले. सुरुवातीला अपर महासंचालक व्हटकर यांनी मानवंदना स्विकारली. त्यानंतर प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील यांनी नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी अंमलदारांना सेवेचे शपथ दिली.
प्राचार्य पाटील यांनी अहवाल वाचन केले. ते म्हणाले, प्रशिक्षणार्थीन्चे सत्र फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झाले. त्यामध्ये मुंबई शहर, ठाणे शहर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुगर्, रत्नागिरी, पुणे लोहमागर्, लातूर, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण आदी घटकांमधून ६०९ प्रशिक्षणार्थी आले होते. या काळात त्यांना फौजदारी कायदे, कायदा, सुव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान, पोलिस प्रशासन आदी विषयांचे सखोल ज्ञान देण्यात आले आहे. तसेच कवायत, परेड, हत्यारांचे तसेच गोळीबाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जवळच्या पोलिस ठाण्यांना भेटी देऊन ठाणेअंतर्गत कामकाजाचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण केंद्राला शासनाच्या विविध विभागांकडून करण्यात आलेल्या मदतीबद्दल त्यांनी संबंधितांचे आभार व्यक्त केले.
यावेळी प्रशिक्षणादरम्यान प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थीना विविध स्वरूपातील बक्षीसांचे प्रमुख पाहुणे अपर महासंचालक व्हटकर यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. यावेळी आमदार सुमन पाटील, सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, तुरचीचे सरपंच, उपप्राचार्य सुजय घाटगे, राजश्री पाटील, प्रशिक्षणर्थीन्चे पालक, नातेवाईक उपस्थित होते. राजू शिंदे यांनी सूत्रसंचलन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.