कोल्हापूर परिक्षेत्रातील ३६ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
दोन निरीक्षकांचाही समावेश, विशेष महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे आदेश
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर परिक्षेत्रातील ३६ सहायक पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्राअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सहीने शनिवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. परिक्षेत्रातील ७ अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. चार अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगलीतील सातजणांची बदली झाली असून तिघांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तर सात अधिकारी नव्याने सांगलीत येणार आहेत. कोल्हापूरचे निरीक्षक तानाजी सावंत यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. तर कोल्हापुरातील दत्तात्रय बोरिगिड्डे यांची सोलापूर ग्रामीणकडे बदली करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील ७ सहायक निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून सातारा जिल्ह्यात ९ सहायक निरीक्षक नव्याने येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात २ अधिकारी नव्याने येणार आहेत. सोलापूर ८ जणांची बदली झाली असून १२ जण नव्याने येणार आहेत. पुणे ग्रामीणमधील ४ अधिकाऱ्यांची बदली झाली असून ९ अधिकारी नव्याने येणार आहेत.
सांगलीतील सहायक निरीक्षक मायादेवी काळगावे, सिकंदर वर्धन, संतोष गिरी गोसावी यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सांगलीतील संदीप मोरे यांची पुणे ग्रामीण, साताऱ्याचे सुनील गायकवाड यांची कोल्हापूर येथे, सांगलीतील पंकज पवार यांची पुणे ग्रामीणकडे, समीर ढोरे, विनोद कांबळे यांची सोलापूर ग्रामीणकडे, सांगलीतील जयश्री वाघमोडे यांची साताऱ्याला तर प्रियांका बाबर यांचीही साताऱ्याला बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.