शरद पवार आता भाजपला धक्का देणार?
माजी खासदार पवारांच्या भेटीसाठी मोदीबागेत
पुणे : खरा पंचनामा
भाजप नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी आज सकाळी पुण्यातील मोदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार आता अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनंतर संजय काकडे यांनी पक्षात घेत भाजपला धक्का देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आशात राज्यात राजकीय भेटीगाठी वाढल्या असून, प्रत्येक ईच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. आता संजय काकडे यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.
दरम्यान शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय काकडे यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकारांशी बोलताना काकडे म्हणाले, "मी माझ्या मित्राच्या कामानिमित्त शरद पवार यांना भेटायला आलो होते. त्यामुळे या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. माझ्या या भेटवर पक्षातील कोणी काही बोलले तर उत्तर देण्यास सक्षम आहे. तसेच पक्षाने याबाबत विचारणा केल्यास पक्षासही स्पष्टीकरण देण्यास तयार आहे."
या सर्व घडामोडींमध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनीही आज शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर बच्चू कडू महायुतीला रामराम ठोकत महाविकास आघाडीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
याबाबत काकडे यांना विचारले असता, ते म्हणाले "बच्चू कडू यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांचे दोन आमदार आहेत. त्यामुळे मी त्यांना कोणाबरोबर युती-आघाडी करायची याबाबत सल्ला देऊ शकत नाही. परंतु, बच्चू कडू माझे मित्र आहेत. त्यांना मी 20 वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे ते कुठे जातील असे मला वाटत नाही."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.