"ढेकणाला आव्हान द्यायचं नसतं, चिरडायचं असतं"
ठाकरेंचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल
पुणे : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज पुण्यात मेळावा झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, तुमची तेवढी कुवत नाही, अशी बोचरी टीका केली आहे.
मी मुंबईच्या शिवसेनेच्या मेळाव्यात म्हणालो होतो. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. काहीजणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं आहे. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणले महाराष्टावर दरोडेखोरांचा. पक्षावर दरोडे टाकणारा आहे. ढेकणाला आव्हान देत नाही, ढेकणं अंगठ्याने चिरडायची असतात, असं ठाकरे म्हणाले.
त्यांना वाटलं मी त्यांनाच बोललोय. ते म्हणाले माझ्या नादाला लागू नका. तुमच्या नादाला लागण्याइतके तुम्ही कुवतीचे नाही, असा बोचरा वार उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.