Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बेपत्ता आण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला अकिवाट दुर्घटना, बैरागदार अद्याप बेपत्ताच

बेपत्ता आण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला
अकिवाट दुर्घटना, बैरागदार अद्याप बेपत्ताच



कुरुंदवाड : खरा पंचनामा
        
शिरोल तालुक्यातील अकिवाट येथे शुक्रवारी सकाळी ट्रैक्टर उलटून झालेल्या दुर्घटनेत सरपंच पतिचा मृत्यू झाला होता. यातून पाचजन बचावले होते तर दोघे बेपत्ता झाले होते. बेपत्ता झालेल्यापैकी आण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह राजापुर पुलाजवळ आज शनिवारी सापडला तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अजूनही बेपत्ता आहेत.

बस्तवाड हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर उलटून आठ जण पाण्यात वाहून जात होते. सहा जण सुखरूप बाजूला आले तर माजी जि. प सदस्य इकबाल बैरागदार, आण्णासाहेब हसुरे दोघे पाण्यात वाहून गेले होते. त्यापैकी आज  सकाळी 12 वाजता वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोध मोहिमेत माजी सरपंच अण्णासाहेब हसरे यांचा मृतदेह शोधून काढला.
   
दरम्यान हा मृतदेह अकिवाट राजापूर पुलाजवळ सापडला. माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल वैरागदार यांचा अध्यापही शोध लागलेला नाही त्यांची शोध मोहीम सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.