Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांनाच संरक्षणाची गरज! आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला

पोलिसांनाच संरक्षणाची गरज! 
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला



पुणे : खरा पंचनामा

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे. भर दिवसा हत्या आणि महिलांवर अत्याचाराच्या घटन घडत आहेत. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुण्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच हल्ला झाला आहे.

पुण्यात कोयता टोळीने केला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केला आहे. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता हल्ला कोयता टोळीने केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. रत्नदीप गायकवाड यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडाचे नाव निहाल सिंग असे आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.