Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो.'

'गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो.'



मुंबई : खरा पंचनामा


विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजित पवार गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. या सगळ्यात घडामोडी सुरु असताना अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जाणार असल्याचे म्हटले आहे.

गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वतः अजित पवार प्रयत्न करत असल्याचे दिसून येतंय. त्यासाठी त्यांनी यापुढे अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत. एवढंच नाही तर त्यासाठी अजित पवारांनी 12 गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचेही समजते.

याशिवाय, अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केलीय. अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरु केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसते. दरम्यान, आता गुलाबी कॅम्पेनवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

त्या म्हणाल्या की, "गुलाबी जैकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेस फिरवून, जन सन्मान होत नसतो. त्या जनतेने कष्टाने कमावलेल्या पैशातून भरलेल्या काराचा अपव्यय न कारणे, भ्रष्टाचार ना कारणे हा हाईल जनतेचा खरा सन्मान. तो तुमच्यांनी या जन्मी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो'. या आशयाचे ट्विट अंजली दमानिया यांनी केलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.