Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार तुमची भूमिका बदलते"

"बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार तुमची भूमिका बदलते"



मुंबई : खरा पंचनामा

बीडमधील परळी या ठिकाणी राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन तिने जीवन संपवले होते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी कोर्टातही धाव घेतली होती. पण त्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवरुन उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

पूजा चव्हाण हिने फेब्रुवारी 2021 मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी चित्रा वाघ यांनी जनहित याचिका दाखल केली होती. चित्रा वाघ यांनी तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी न्यायालयाने ही याचिका निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती.

आता याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने चित्रा वाघ यांना खडे बोल सुनावले. तुमच्यासारखे अनेक राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. तसेच या माध्यमातून न्यायालयांना विनाकारण त्यात ओढले जात आहेत, असे न्यायालयाने म्हटले.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका पार पडली. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना त्यात ओढले जात आहे. राजकारण करण्याचा हा मार्ग नाही आणि तो कधीही योग्य नाही, असे ताशेरे न्यायालयाने चित्रा वाघ यांच्यावर ओढले. यानंतर चित्रा वाघ यांनी याचिका मागे घेणार नसल्याचे स्पष्टीकरण वकिलामार्फत न्यायालयाला दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.