सांगली येथून पतीशी भांडण करून निघालेल्या महिलेला देवगड पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात
देवगड : खरा पंचनामा
पतीशी भांडण करुन सांगली येथून घरातून निघून गेलेल्या महिलेला देवगड येथे पोलीसांनी ताब्यात घेतले. पतीशी भांडण झाल्यानंतर जीवाचे बरे वाईट करून घेण्याचा उद्देशाने ती देवगड येथे आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली येथील २७ वर्षीय विवाहित महिला घरी पतीशी भांडून शुक्रवारी आपण ५.०० वाजेपर्यंत आपल्या जिवाचे कमी जास्त करून घेणार आहे, असे सांगून दि. ८ ऑगस्ट रोजी सांगली येथील घरातून बाहेर निघून गेली होती. या संदर्भात सांगली येथील माजी महिला नगरसेविका हिने. तिचे लोकेशन देवगड एस. टी. स्टॅण्ड परिसरात मिळत आहे, असे देवगड पोलिसांना सांगितले. त्यानुसार देवगड पोलीस निरिक्षक अरुण देवकर यांच्य मार्गदर्शनखाली देवगड पोलीस स्थानक नेमणुकिवर असलेल्या ठाणे अंमलदार महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अनविता आशिष कदम, महिला पोलिस कॉन्स्टेबल दर्शना देवगडकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर चौगुले यांना सदर महिलेच्या शोधकामी रवाना करण्यात आले.
देवगड एस. टी. स्टॅण्ड वर जाऊन तिच्या फोटो द्वारे शोध घेतला असता प्रसंगी सिसी टिव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता तिचा शोध लागला नाही. म्हणून तिचा शोध व अधिक माहिती देवगड महिला पोलिसांनी आजूबाजूला चौकशी करून शोध घेतला असता. ती देवगड येथील एका कॉम्प्लेक्स च्या बाजूला एका घरात सुस्थितीत असल्याची माहिती मिळताच तिला तेथे जावून ताब्यात घेतले व देवगड पोलिस स्थानकात आणून तिची या संदर्भात अधिक चौकशी करून तिच्या नातेवाईक यांची माहिती घेत त्यांना फोन करून कळविले.
दरम्यान देवगड महिला पोलीस कर्मचारी यांनी तिला चहा नाश्ता व्यवस्था करून तिची काळजी घेतली. तिचे नातेवाईक तिला घेण्यासाठी देवगड येथे सांगली वरून आले व रात्री उशिरा. नातेवाईक येताच तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.