पोलिस कॉलनीतील तेरा घरांमध्ये एकाच वेळी घरफोडी
मुंबई : खरा पंचनामा
माहीम पोलीस कॉलनीतील एकाच वेळी तेरा पोलिसांच्या घरात घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री पोलिसांच्या घरांचा कडी-कोयंडा तोडणारा चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मध्य रात्री दबक्या पावलाने पोलीस वसाहतीत येत पोलिसांची घर बंद असल्याची खात्री करून घरफोडी करण्यात आली आहे. पोलिसांच्या घरांवरच डाका टाकणाऱ्या चोराचे सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आले आहे.
या घटनेमध्ये पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची तसेच देवाच्या चांदीच्या मूर्तीची देखील चोरी करण्यात आली आहे. पोलिसांच्या घरांसह चोरच्याने वसाहतीमधील प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयाला देखी लक्ष केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांमध्ये घरफोडी करण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात अज्ञातविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.