छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा बांधणारा कंत्राटदार कोल्हापूरचा
कोल्हापूर : खरा पंचनामा
राजकोट (मालवण) येथील पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम व या कामाच्या सल्लागारपदाची जबाबदारी कोल्हापुरातील डॉ. चेतन एस. पाटील यांच्यावर होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याप्रकरणी डॉ. पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
या पुतळ्याचे काम जयदीप आपटे या युवा कारागीराला दिले होते. आपटे मूळचे ठाणे जिल्ह्यातील आहेत. या कामाचा चबुतरा बांधकामांसह स्ट्रक्चरल कन्स्लटंट म्हणून डॉ. चेतन पाटील यांना काम देण्यात आले होते. डॉ. पाटील शिवाजी पेठेतील रहिवाशी असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सध्या ते एका स्वायत्त विद्यापीठातील सिव्हील इंजिनिअरींग शाखेत कार्यरत आहेत. त्यात ते स्ट्रक्चलर सल्लागार म्हणून काम पाहतात. पुतळा उभारणी व त्यासाठीचा चबुतरा बांधकामाची निविदा निघाल्यानंतर डॉ. पाटील यांनी ती भरली. त्यांना हे काम मिळाले. डॉ. पाटील यांच्यावर सल्लागार म्हणूनही जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला.
दरम्यान, काल दुपारी जुना राजवाडा पोलिसांच्या मदतीने मालवण पोलिस डॉ. चेतन पाटील यांच्या शिवाजी पेठेतील घरी पोहोचले. वेताळ तालमीच्या परिसरात डॉ. पाटील यांचे घर आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केल्याचे सांगण्यात आले. यावेळी डॉ. पाटील घरी नव्हते. दुपारनंतर त्यांच्या घराला कुलूप आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.