Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'100 ग्रॅम'मुळे विनेश फोगटच्या नशिबी अपयश

'100 ग्रॅम'मुळे विनेश फोगटच्या नशिबी अपयश



पैरिस : खरा पंचनामा

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने ऑलिम्पिक फायलनमध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने या स्पर्धेतून बाहेर तिला बाहेर काढलं गेलं. 50 किलो वजनी गटातून खेळण्यासाठी ती अपात्र ठरली आहे.

पण काल रात्री झोपेचा विचार न करता तिने प्रचंड मेहनत घेतली. 50 किलो वजनी गटात बसावं, यासाठी तिनेरात्रभर प्रचंड मेहनत घेतली. जॉगिंग, स्किपिंग आणि सायकलिंग तिने केली. मात्र तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही. केवळ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.

काल रात्री विनेशने जेव्हा तिचं वजन केलं तेव्हा ते 2 किलो पेक्षा जास्त असल्याचं तिच्या लक्षात आलं. पण काहीही झालं तरी भारतासाठी मेडल जिंकायचंच हा विनेशचा निर्धार होता. त्यामुळे तिने प्रचंड मेहनत घेतली. रात्रभर विनेश झोपली नाही. तिने जॉगिंग, स्किपिंग केलं. रात्रभर सायकल चालवली. पण केवळ 100 ग्रॅम वजनामुळे तिचं मेडल जिंकण्याचं स्वप्न भंग झालं. सकाळी विनेशने ऑलिम्पिककडे वजन करण्यासाठी आणखी थोडा वेळ मागितला. तिला विश्वास होता की आणखी थोडी मेहनत घेतली तर ती हे वजन कमी करू शकते. पण तसं झालं नाही. केवळ 100 ग्रॅम वजनामुळे तिला या स्पर्धेतून बाहेर काढलं गेलं.

महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातून विनेश फोगाट काल फायलनमध्ये पोहोचली होती. मात्र आता तिचं हे स्वप्न संपुष्टात आलं आहे. कारण 50 किलो वजनी गटात विनेशचं 100 ग्रॅम वजन जास्त झालं. त्यामुळे तिला या स्पर्धेतून बाहेर काढलं गेलं. सेमी फायनल जिंकल्याच्या आनंदात तिने त्याचा जल्लोष न करता वजन कमी करण्यासाठी मेहनत घेतली. वजन कमी भरावं यासाठी तिने तिची नखं कापली. केस कापले. पण तरिही अपेक्षेएवढं वजन कमी नाही झालं.

विनेशचे वडील महावीर फोगाट यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विनेशसोबत जे घडलं त्यामुळे सगळ्या देशाला दुःख झालं आहे. 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने तिला मेडलपासून दूर राहावं लागलं. पण ती मेहनत करेन. 2028 च्या ऑलिम्पिकची ती तयारी करे, असं महावीर फोगाट यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.