Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांचा राजीनामा? देश सोडून भारतामध्ये दाखल

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांचा राजीनामा? 
देश सोडून भारतामध्ये दाखल



नवी दिल्ली : खरा पंचनामा

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून देशातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनादरम्यान आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या हिंसाचारादरम्यान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशची राजधानी ढाका सोडली असून त्या भारतात दाखल झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. ढाक्यातील पंतप्रधान निवासस्थानी हजारो आंदोलक घुसले असून शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत अज्ञात स्थळी रवाना झाल्या असल्याची माहिती बांग्लादेशमधील माध्यामांनी दिली आहे. यानंतर थोड्याच वेळात बांगलादेश लष्करकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता बांगलादेशमधील सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.