Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईडीच्या सहाय्यक संचालकाला २० लाखांची लाच घेताना अटक; सीबीआयची मोठी कारवाई

ईडीच्या सहाय्यक संचालकाला २० लाखांची लाच घेताना अटक; सीबीआयची मोठी कारवाई



दिल्ली : खरा पंचनामा

गेल्या काही वर्षात देशभरातील सीबीआय आणि ईडीची कारवाई हा विषय चांगलाच चर्चेत राहिला आहे. सीबीआय आणि ईडीच्या कारवाई संदर्भात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. मात्र, आता सीबीआयने ईडीच्या सहाय्यक संचालकालाच लाचखोरीच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने राजधानी दिल्लीत तब्बल २० लाखांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) सहाय्यक संचालकाला अटक केली आहे.


ईडीच्या सहाय्यक संचालकाला २० लाखांची लाच घेताना अटक करत सीबीआयने मोठी कारवाई केली. संदीप सिंह यादव असं अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील लाजपत नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. मात्र, ईडीचा सहाय्यक संचालकच २० लाखांची लाच घेताना पकडल्यामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या अधिकाऱ्याने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका व्यावसायिकाकडून २० लाख रुपयांची मागणी केली होती. ही २० लाखांची लाच स्वीकारताना ईडीच्या सहाय्यक संचालकाला रंगेहात पकडण्यात आलं आहे. ईडीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात एका ज्वेलर्सच्या मुलाला दिलासा देण्याच्या बदल्यात ही लाच या अधिकाऱ्याने मागितली असल्याचं सांगितलं जात आहे.

ईडीच्या सहाय्यक संचालकाने एका व्यावसायिकाकडून २० लाखांची लाच मागितल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर सीबीआयने तात्काळ सापळा रचत ईडीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.