Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा



पुणे : खरा पंचनामा

बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकत कारवाई करून पुणे पोलिसांनी माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. येथून तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट असा २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

छुप्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू होता. कोंढव्यातील द व्हिलेज हॉटेलवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर आता पुण्यातील अन्य काही हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर आली आहेत. बाकीर रमेश बागवे (३६, रा. भवानी पेठ), हरून नबी शेख (२५), बिक्रम साधन शेख (२०), अमानत अन्वर मंडळ (२२), अमानत अन्वर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील बाकीर माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आहे.

कोंढवा भागातील व्हिलेज हॉटेलमध्ये अवैधरित्या नागरिकांना हुक्का पुरविला जात असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून कोंढवा पोलीस तपास करत आहेत. कोंढवा पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकत 23 हजार 500 रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. तसेच हुक्क्याचे फ्लेवर्स आणि काचेचे नऊ हुक्का पॉटही जप्त करण्यात आले आहेत.

हा संबंधित हुक्का पार्लर हा माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाचा असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते व माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा मुलगा हा हुक्का पार्लर चालवत होता. त्यामुळे त्यांच्या मुलासह 5 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.