Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वातंत्रदिनानिमित्त मध्यरेल्वे नागपूर, कोल्हापूरसाठी सोडणार विशेष गाड्या !

स्वातंत्रदिनानिमित्त मध्यरेल्वे नागपूर, कोल्हापूरसाठी सोडणार विशेष गाड्या !



मुंबई : खरा पंचनामा

स्वातंत्र्यदिनापासून सलग सुट्यांमुळे बाहेर जाण्याच्या विचारात असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १४ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूरपर्यंत ही सुविधा असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा आहे. मात्र, या सुविधेसाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

०२१३० एलटीटी-नागपूर एसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन गुरुवार १५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सुटून नागपूरला दुपारी साडेतीन वाजता पोहोचणार आहे.

परतीकरिता ०२१४० ट्रेन १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी दीड वाजता निघून एलटीटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी येणार आहे. या ट्रेनला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकात थांबा दिला आहे. तर ०१४१७ सीएसएमटी-कोल्हापूर स्पेशल ट्रेन २० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी निघून कोल्हापूरला दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे. तर ११४१८ ट्रेन १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता सुटून सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता येणार आहे. या ट्रेनला कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज स्थानकात थांबा दिला आहे. याशिवाय ०२१४३-४४ पुणे नागपूर एसी सुपरफास्ट आणि ०६५३३-३४ कलबुर्गी-बेंगळूर दरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.