तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी दीक्षांत संचलन समारंभ
प्राचार्य धीरज पाटील यांची माहिती
सांगली : खरा पंचनामा
महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण संचलनालय संचलित तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी नवप्रविष्ठ पोलिस अंमलदारांच्या ९ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांच्याहस्ते हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील यांनी दिली.
प्राचार्य पाटील म्हणाले, शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख अतिथींचे आगमन झाल्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्याकडून परेडचे निरीक्षण होईल. त्यानंतर नवप्रविष्ठ पोलिस अंमलदारांचा शपथ ग्रहण समारंभ होईल. त्यानंतर संचलन होईल. यावेळी प्राचार्य धीरज पाटील अहवाल वाचन करतील. त्यानंतर यशस्वी प्रशिक्षणार्थ्याना पारितोषिक वितरण करण्यात येईल. त्यानंतर अपर महासंचालक व्हटकर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास पोलिस दलातील वरीष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य धीरज पाटील, उपप्राचार्य राजश्री पाटील, सुजय घाटगे यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.