"माझ्या नादी लागू नका, नाहीतर..."
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
"माझ्या दौऱ्याशी जरांगे पाटलांचा काहीएक संबंध नव्हता. मात्र त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार, उद्धव ठाकरे राजकारण करतात', असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
"लोकसभेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात मतदान झालं होतं. हे मतदान शरद पवार आणि उध्दव ठाकरे त्यांच्या प्रेमाखातर झालं नव्हतं हे त्यांनी समजून घ्यावे, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले. तसेच शुक्रवारी झालेल्या बीडच्या आंदोलनावर देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. कालच्या आंदोलनात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होता. त्याला आमच्या पोरांनी मार मार मारलं. नशीब पोलीसमध्ये पडले. तो ओरडत गेला "एक मराठा लाख मराठा" याचा अर्थ यांना दाखवायचंय हे आंदोलन जरांगे पाटलांचं आहे. पण जरांगेंच्या आडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरु आहे", असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
"शरद पवारांसारखा 82, 83 वर्षाचा माणूस विधान करतो की महाराष्ट्राचं मणिपूर होईल. म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये, याची चिंता केली पाहिजे. पण ते म्हणतायत मणिपूर होईल, म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे, हे तुम्हाला कळेल, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. पुढच्या तीन, साडेतीन महिन्यात यांना जेवढ्या काही दंगली घडवता येतील, खासकरून मराठवाड्यात यासाठी यांचा प्रयत्न सुरू आहे", असा आरोप राज ठाकरेंनी पवार, ठाकरेंवर केला.
"शरद पवारांचं जर राजकारण बघितलं तर दुसऱ्यांच्य जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी राष्ट्रवादी सूरू केल्यानंतर सूरू झालं, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. माझ्या दौऱ्यात यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, उद्या माझं वादळ उठलं तर यांना निवडणुकीला एकही सभा घेता येणार आहे. माझ्या वाट्याला जाऊ नका. माझ्या नादी लागू नका', असा इशारा देखील राज ठाकरेंनी पवार, ठाकरेंना दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.