शरद पवारांनी Z+ सुरक्षा नाकारली
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे (एस.पी.) अध्यक्ष शरद पवार यांनी झेड प्लस (Z+) सुरक्षा नाकारली आहे. माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, "सरकारने दिलेली गाडी वापरणार नाही. माझ्या गाडीत कोणत्याही सुरक्षा अधिकाऱ्यांना बसवणार नाही".
केंद्र सरकारने पवारांना Z+ सुरक्षा पुरवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने काही दिवसांपुर्वी झेड दर्जाची सुरक्षा पुरवली होती. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतल्यानंतर शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, त्यांना केंद्राची झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले होते. यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार शरद पवारांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. या सुरक्षेअंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ५५ सशस्त्र जवानांचे पथक शरद पवारांच्या सुरक्षेत तैनात असणार होते.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांत दौरे सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पवारांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली होती, त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. तसेच, आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.