मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याला 10 लाखांची लाच घेताना पकडले
गुजरात एसीबीची धडक कारवाई
मुंबई : खरा पंचनामा
गुजरात एसीबी पथकाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. राजकोट येथील सायबर गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याला 10 लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माटुंगा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास दिगंबर पगार यांनी 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी संबंधिताने गुजरातच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून गुजरात एसीबीने सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर पगार यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला.
गुजरातच्या राजकोट येथील सायबर गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी दिगंबर पगार यांनी लाच मागितली होती. दिगंबर पगार यांना गुजरात एसीबी पथकाने 10 लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. या प्रकारणी पगार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर मुंबई पोलीस दलाकडून दिगंबर पगार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.