Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार!

वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार!



सोलापूर : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील माय माऊलीना वर्षाला 3 गॅस सिलिंडरमोफत देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळं आता महिलांना चुलीपुढे धूर फुकण्याची गरज नसल्याचे अजित पवार म्हणाले.

मोहळमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलत होते. आता एकदम पारदर्शक कारभार आहे. भ्रष्टाचाराची भानगडच नाही असेही अजित पावर म्हणाले.

गरीबांच्या मुली शिकाव्यात यासाठी दीड हजार कोटी देऊन मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. तुम्ही म्हणाल की एवढे पैसे आणले कोठून. तर आपल्या राज्याचे स्थूल उत्पन्न 42 लाख कोटी आहे. त्यातून अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटींचा सादर केला होता असेही अजित पवार म्हणाले. एकूण जीएसटीच्या 16 टक्के जीएसटी एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो. राज्याला विविध मार्गातून जमा होणाऱ्या पैशातून महिला आदिवासी मागासवर्गीय यांच्यासाठी योजना येत असतात असे अजित पवार म्हणाले.

आम्हाला बहीण आणि भाऊ दोघेही लाडके असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले. वारकरी, ज्येष्ठ नागरिक, मुस्लिम, मातंग सर्वांसाठी ही योजना असल्याचे अजित पवार म्हणाले. मराठा, ओबीसी, आदिवासी या सर्वांच्या महामंडळाला पैसे दिले आहेत. लोकसभेला मुस्लिम समाजाने आमच्याकडे पाठ फिरवूनही, मुस्लिम समाजासाठी योजना आणून त्यांना 1 हजार कोटी दिले असून कर्जाची हमी सरकारने घेतल्याचे अजित पवार म्हणाले.

विरोधक केवळ आमच्यावर टीका करतात, ते दुसरं काही करु शकत नाहीत. आता सर्व पाणी उपसण्याची योजना सोलरवर घेत असल्यामुळे शेतकऱ्यांवर लाईट बिल भरण्याचा बोजा येणार नाही. अशा योजना चांगल्या पद्धतीने चालवू असे अजित पवार म्हणाले. यासाठी या बजेटमध्ये हे वीज बिल सोलर पॅनलमध्ये घेवून शेतकऱ्यांना फक्त पाणीपट्टी भरावी लागेल. विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडूण आणा असं आवाहन देखील अजित पवार यांनी जनतेला केलं. केवळ एक वर्ष कळ काढा पुढच्या वर्षीपासून सर्व शेतकऱ्यांना रात्री नाही तर दिवसा देखील शेतीला वीज मिळू शकेल असे अजित पवार म्हणाले. सध्या साडेनऊ हजार मीटर मेगा वॅट वीज सोलर वर बनवत आहे. विरोधक केवळ आमच्यावर टीका करत आहेत. ते दुसरं काही करु शकत नाहीत. कुणी टीका केल्यानं आमच्या अंगाला काही भोक पडत नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.