शर्मिला ठाकरे यांच्याकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना 51 हजारांचे बक्षीस जाहीर
मुंबई : खरा पंचनामा
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. बंदूक घेत तीन राऊंड फायर केले, याला प्रत्युत्तर देताना आत्मरक्षणासाठी त्याचा एन्काऊंटर केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
विरोधक या एन्काऊंटरवरून सरकारवर टीका करत आहेत, मात्र मनसेने पोलिसांनी योग्य केल्याचं म्हणत घटनेचे समर्थ केले आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोन्ही पोलिसांना प्रत्येकी 51 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबाबत मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी माहिती दिली.
जे झालं ते योग्य झालं, ज्या पद्धतीने तीन-चार वर्षांच्या मुलीवर हात टाकताना मागेपुढे पाहिलं नाही. झालेल्या घटनेचे आम्ही समर्थन करतो. शर्मिला ठाकरे यांनी दोन्ही पोलिसांनी 51 हजार रूपये बक्षीस जाहीर केलं आहे. पैसे महत्त्वाचे नाहीत तर त्यांच्या जीवावर बेतलं गेलं असतं, याचं उत्तर असंच दिलं गेलं पाहिजे, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.