Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा झेंडा; ठाकरे गटाचे 7 उमेदवार विजयी

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा झेंडा; ठाकरे गटाचे 7 उमेदवार विजयी



मुंबई : खरा पंचनामा

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. 10 पैकी 7 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर उर्वरीत तीन जागांवरवर देखील युवासेनेचेच उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

थोड्याच वेळात मतमोजणी पूर्ण होऊन सर्व निकाल हाती येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे उमेदवार उर्वरीत तीनही जागांवर आघाडीवर आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या 10 जागांसाठी सिनेट निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी 28 उमेदवार रिंगणात होते. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्र आणि 64 बूथवर या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी मतदारांची एकूण संख्या 13,406 इतकी होती. प्रत्यक्षात निवडणुकीत एकूण 55 टक्के मतदान झाले. एकूण 7 हजार 200 मतांपैकी 6 हजार 684 मते वैध आणि 516 मते अवैध ठरली आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने विजयी आघाडी घेतली असून राखीव गटातील 5 उमेदवारांचा विजय झाला आहे, तसेच इतर दोन उमेदवार देखील विजयी झाल्याची माहिती समोर येत आहे. अजून मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल. या निवडणुकीच्या रिंगणात आदित्य ठाकरे यांचा पाठिंबा असलेली युवा सेना आणि भाजपची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आमनेसामने आहे. याआधी 2018 मध्ये युवा सेनेने एकतर्फी विजय नोंदवला होता आणि सर्व 10 जागांवर विजय नोंदवला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.