Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे ग्रामीण पोलीस दलातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा आदेश

पुणे ग्रामीण पोलीस दलातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या 
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा आदेश



संभाजी पुरीगोसावी 
पुणे : खरा पंचनामा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील मागील काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यानंतर आता पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शनिवारी रात्री उशिरा काढले आहेत. यामध्ये मंचर, खेड, शिरूर, आळेफाटा, पौड, बारामती शहर, बारामती तालुका, माळेगांव, सुपा या पोलीस ठाण्यात आता नव्या कारभाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव कंसात बदलीचे ठिकाण : श्रीकांत कुंकाळ (नव्याने हजर मंचर पोलीस ठाणे), विलास नाळे (नव्याने हजर, बारामती शहर पोलीस ठाणे),  विश्वास जाधव (नव्याने हजर, बारामती तालुका पोलीस ठाणे), संदेश केंजळे (नव्याने हजर, शिरूर पोलीस ठाणे), राजेश रामाघरे (नव्याने हजर, आर्थिंक गुन्हे शाखा), संतोष गिरीगोसावी (जिल्हा वाहतूक शाखा ते पौड पोलीस ठाणे), संतोष घोळवे (बारामती शहर पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), गोरख गायकवाड (बारामती तालुका पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), ज्योतीराम गुंजवटे (शिरूर पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), अरुण फुगे (मंचर पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष), संतोष जाधव (नियंत्रण कक्ष ते जिल्हा वाहतूक शाखा), दिनेश तायडे (पोलीस उपअधीक्षक मुख्यालय बारामती ते आळेफाटा पोलीस ठाणे), प्रभाकर मोरे (परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते खेड पोलीस ठाणे), अभिजीत देशमुख (जिल्हा विशेष शाखा ते परकीय नागरिक नोंदणी कक्ष), सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे (इंदापूर पोलीस ठाणे ते वालचंदनगर पोलीस ठाणे), सचिन लोखंडे (आर्थिक गुन्हे शाखा ते माळेगांव पोलीस ठाणे), मनोजकुमार नवसरे (रांजणगांव पोलीस ठाणे ते सुपा पोलीस ठाणे). 

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदस्थापने ठिकाणी तात्काळ हजर राहून तसा अहवाल मुख्यालयाकडे सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.