Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्येच!

विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्येच!



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात विधानसभा निवडणूक लांबणीवर जात असल्याबद्दल विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर होणाऱ्या टिकेपासून ते राष्ट्रपती राजवटींच्या चर्चापर्यंत घडामोडी घडत असतानाच राज्य निवडणूक आयोग मात्र निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात राज्यात निवडणुका पार पडतील, अशी लक्षणे आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी १३ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्य पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत त्यांच्याकडून जिल्हा स्तरावरील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

मागील तब्बल तीन कार्यकाळात हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत. यावेळी मात्र हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तरीही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. उलट विरोधी महाविकास आघाडीने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मतदारांचा हा कल कायम राहिल्यास विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसू शकतो, या भीतीने सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक लांबवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. निवडणूक लांबणीवर टाकून विधानसभेचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर काही काळ राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, अशाही चर्चा आहेत.

मात्र, सत्ताधाऱ्यांकडून या आरोपाचे खंडन केले जात आहे. विधानसभा निवडणूक गृहीत धरून राजकीय पक्षांच्या हालचालीही सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. सुमारे एक आठवड्याच्या कालावधीत जागावाटपाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळण्या न मिळण्याच्या संभावनेतून राजकीय पक्षांमध्ये आवक जावकही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आता खुद्द राज्य निवडणूक आयोगच कंबर कसून कामाला लागल्याचे चित्र दिसत असल्यामुळे नोव्हेंबर मध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार, हे निश्चित मानले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.