Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दुचाकी चोरट्याला अटक एक लाखाचा मुद्देमाल जप्त, संजयनगर पोलिसांची कारवाई

सांगलीत दुचाकी चोरट्याला अटक 
एक लाखाचा मुद्देमाल जप्त, संजयनगर पोलिसांची कारवाई



सांगली ः खरा पंचनामा

शहरातील संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणत चोरीच्या एक लाख रूपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली. 

आमीर हुसेन शेख (वय २२, रा. सहारा चौक, संजयनगर, सांगली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. दि. ४ सप्टेंबर रोजी हडको कॉलनीतील दर्शन बोधे यांची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी ती दुचाकी आमीर शेख याने चोरल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली.  

सहारा चौक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने अभयनगर, विद्यानगर, वारणाली, हडको कॉलनी आदी ठिकाणाहून पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या पाचही दुचाकी जप्त करण्यात आल्या. 

संजयनगरचे पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाने दीपक गायकवाड, विनोद साळुंखे, संतोष पुजारी, कपील साळुंखे, नवनाथ देवकाते, सुशांत लोंढे, आकाश गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.