Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईतील पाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या दिक्षीत कुमार गेडाम परिमंडळ नऊचे पोलिस उपआयुक्त

मुंबईतील पाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या
दिक्षीत कुमार गेडाम परिमंडळ नऊचे पोलिस उपआयुक्त 



मुंबई : खरा पंचनामा

शहरातील पाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तेजस्विनी सातपुते यांची पुण्यात तर राजतिलक रोशन यांच्याकडे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त दिक्षीत कुमार गेडाम यांची परिमंडळ नऊचे पोलिस उप आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबई शहरातील पाच पोलीस उपायुक्तांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले.

सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांची परिमंडळ पाच,  संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांची परिमंडळ आठमध्ये बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार यांची घाटकोपर विभागात, संरक्षण व सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांची वडाळा पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महेश बळवंतराव यांची एमएचबी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.