मुंबई-कोल्हापूर प्रवास ३ तासात!
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकरांना आनंदाची बातमी आहे. वेगवान आणि आरामदायी वंदे भारत एक्स्प्रेस या मार्गावर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईहून पुणे कोल्हापूरकडे जाणारी दुसरी वंदे भारत ट्रेन असणार आहे.
पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी-पुणे-सोलापूर मार्गावर धावत आहे. या नवीन ट्रेनमुळे मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. तसेच या क्षेत्रातील आर्थिक संबंधही मजबूत होतील. या नवीन ट्रेनमुळे या शहरांदरम्यान प्रवास करणे अधिक सोयीचे आणि वेगवान होणार आहे. तसेच या भागातील अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
"सध्या मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस धावते, जी 518 किलोमीटरचं अंतर सुमारे 10.30 तासांमध्ये पार करत असून सरासरी ताशी वेग 48.94 किमी आहे. वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावर सुरू झाली तर प्रवासाच्या वेळत मोठी बचत होणार आहे, मा या ट्रेनचं अद्याप नेमका वेळापत्रक अद्याप ठरवलेले नाही, अशी माहिती एका रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.
पुणे-मिरज मार्गाचं दूपदरीकरण पूर्ण झाल्यामुळे आता जास्त ट्रॅक उपलब्ध आहेत, त्यामुळे या मार्गाव जलद ट्रेन चालवणे शक्य होणार आहे. या नव्या ट्रेन्सह, मध्य रेल्वे मुंबईहून पाच वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जाणार आहेत, तर पश्चिम रेल्वे दोन गाड्यांसह मुंबई आणि गुजरात दरम्यान चालवणार आहे. पश्चिम रेल्वेच्या सेवांमध्ये मुंबई सेंट्रल-गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल-अहमदाबाद मार्गांचा समावेश आहे.
मुंबई-पुणे-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर महाराष्ट्रातील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची एकूण संख्या 11 वर पोहोचणार आहे. ज्यात नागपूर आणि पुण्यातून सध्या सुरू असलेल्या ट्रेनचाही समावेश आहे. तसेच नागपूर- सिकंदराबाद आणि पुणे-हुबळी मार्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला वेग, आराम आणि अत्याधुनिक सुविधांसाठी ओळखली जाते. रेल्वेच्या आधुनिकीकरणातील हा एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.