Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आटपाडीतील सराफांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक पश्चिम बंगालमध्ये सांगली एलसीबीची कारवाई

आटपाडीतील सराफांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
पश्चिम बंगालमध्ये सांगली एलसीबीची कारवाई



सांगली ः खरा पंचनामा

जिल्ह्यातील आटपाडी येथील सराफाकडून चोख सोने घेऊन त्याने दागिने बनवून देतो असे सांगून साडेतीन किलो सोने घेऊन पळून गेलेल्या दोघांना अटक करण्यात आली. पश्चिम बंगाल येथील पूर्व मेदिनीपूर येथील कोला घाट येथे जाऊन एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

सरूप गोपाल दास (वय ३८), विश्वनाथ गोपाल दास (वय ४०, दोघेही मूळ रा. गोपालनगर, कोला घाट, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आटपाडी येथील प्रसाद जवळे यांनी गौतम दास याला वेळोवेळी दागिने बनवण्यासाठी चोख सोने दिले होते. ते सोने घेऊन गौतम दास साथीदारांसह पळून गेल्याबाबत जवळे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून निरीक्षक शिंदे यांनी यातील संशयितांना पकडण्यासाठी सहायक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील यांची दोन पथके तयार केली होती. 

पथक संशयितांची माहिती घेत असताना ते पश्चिम बंगाल येथील असल्याचे समजले. त्यानंतर सहायक निरीक्षक शिंदे यांचे पथक चोरट्यांचा मागावर पश्चिम बंगाल येथे गेले. तर उपनिरीक्षक पाटील यांचे पथक संशयित पळून गेलेल्या मार्गाची तांत्रिक माहिती जमा केली. पश्चिम बंगाल येथील कोला घाट येथे स्थानिक खबऱ्याद्वारे माहिती मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक शिंदे यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सरूप दास, विश्वानाथ दास यांना ताब्यात घेतले. त्यावेळी गौतम दास पळून जाण्यात यशस्वी ठरला. दोघांनाही तेथील स्थानिक न्यायालयात हजर करून त्यांना सांगलीत आणून आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांनाही तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सायबरच्या सहायक निरीक्षक रूपाली बोबडे, उपनिरीक्षक कुमार पाटील, अनिल ऐनापुरे, अरूण पाटील, प्रकाश पाटील, अजय बेंदरे, सुनील जाधव, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.