बंद हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या दोन सराईतांना अटक
१ लाखांचा मुद्देमाल जप्त, महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
मिरज : खरा पंचनामा
मिरजेतील एक बंद हॉटेल फोडून त्यातील साहित्य चोरणाऱ्या दोन सराईतांना अटक करण्यात आली. त्यांचा एक हद्दपार असलेला साथीदार पसार झाला आहे. त्यांच्याकडून एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली.
सुनील सतीश गुरव (वय २४, रा. रामनगर, सांगली), वासिम शहाजान नदाफ (वय ३२, रा. रामनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांसह हद्दपार असलेला तबरेज बाबुभाई तांबोळी (रा. सांगली) ही पसार झाला आहे. दि. १५ ते २० सप्टेंबर दरम्यान निरंजन देशपांडे यांच्या मिरजेतील हॉटेल वावर येथून अज्ञातांनी साहित्य लंपास केले होते. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यातील चोरट्यांचा शोध घेत होते.
त्यावेळी पथकातील विक्रम खोत यांना मिरज-कोल्हापूर रस्त्यावर दोघेजण चोरीचे साहित्य विक्री करण्यासाठी रिक्षामधून येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील रिक्षाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये फ्रीज तसेच हॉटेलमधील अन्य साहित्य सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी तबरेज तांबोळी याच्या साथीने बंद हॉटेल फोडून साहित्य चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली.
महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, सूरज पाटील, विक्रम खोत, अभिजित धनगर, जावेद शेख, विनोद चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.