Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील : मुख्यमंत्री राज्य उत्पादन शुल्कच्या प्रशिक्षण केन्द्राचे थाटात उदघाटन

सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील : मुख्यमंत्री
राज्य उत्पादन शुल्कच्या प्रशिक्षण केन्द्राचे थाटात उदघाटन



सातारा : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन महिला, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य शासनाने दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पाटण तालुक्यातील 289 कोटींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि लोर्कापण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल काळोली, ता. पाटण ५ कोटी रुपयांचे कामांचा लोकार्पण, नाडे ता. पाटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण, वाटोळे ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई राज्य उत्पादक शुल्क विभागाचे ९४ कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्राचे ई भुमिपुजन तारळी प्रकल्पामधील ५० मी व १०० मी उंचीवरील उपसा सिंचन योजनेच्या ७९ कोटींच्या कामांचा लोकार्पण, पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमीपुजन, मल्हारपेठ येथील ग्रामसचिवालयाच्या नूतनीकरण इमारतीचे लोर्कापण आदींचे विकासाचे भूमीपुजन व लोर्कापण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचालकर, साताराचे अधीक्षक रविंद्र आवळे यांनी नियोजन केले होते. या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सह आयुक्त विश्वनाथ इंदिसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, पाटण तालुक्यातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.