Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपचा आणखी एक नेता हातात तुतारी घेणार!

भाजपचा आणखी एक नेता हातात तुतारी घेणार!



पंढरपूर : खरा पंचनामा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. इच्छुक उमेदवार उमेदवारी ज्या पक्षातून मिळेल तिथे पक्षांतर करताना दिसत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटात माजी आमदार प्रशांत परिचारक प्रवेश करतील अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

दरम्यान पंढरपूर विधानसभेच्या  आखाड्यात प्रशांत परिचारक यांची भूमिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली असून दोन दिवसापूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांनी हजेरी लावली लावल्यामुळे ते भाजप सोडणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. मात्र जालिहाळ येथे कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी पक्ष प्रवेशाबाबत संकेत दिले आहेत.

तुमची जी भावना आहे ती मला निर्णय घेण्यास भाग पाडणार आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण राजकारण करत असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन निर्णय घेणार आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे चार दिवस थांबा. त्यानंतर भूमिका जाहीर करू, असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील जालिहाळ येथे बोलताना व्यक्त केले. त्यामुळे आगामी काळात परिचारक हे हातात तुतारी घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.