"फडणवीसांना मोदी-शहांची भीती म्हणून...'
मुंबई : खरा पंचनामा
स्वारी सुरतेवर केली. आम्हीही तिला स्वारीच म्हणतो. सुरतेवर छापा मारून मिळवलेली संपत्ती महाराजांनी राज्यात आणली. राज्यासाठी वापरली. हे सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भीती वाटत असेल, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जयंत पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या लुटीबाबतच्या वक्तव्यासंदर्भात विचारण्यात आले. त्यावेळी जयंत पाटील यांनी सुरतेची लूट ही कोणत्या अर्थाने म्हणण्यात येते, याबाबत स्पष्टीकरण दिले.
मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात शिवरायांच्या सुरत लुटीच्या इतिहासाबाबत राजकीय नेतेमंडळी अनेक विधान करत आहेत. त्यातही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना शिवरायांनी सुरत लुटली नाही, तर सुरतेवर स्वारी केली. ज्यानंतर यावरून आता राजकीय वाद रंगला असून याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शब्दच्छल करण्यात फडणवीस पटाईत आहेत. लुटली म्हणजे लुटारू नाही. नादीरशाहने सरसकट लूट केली होती. तशी महाराजांनी केली नाही. महाराजांनी यादी तयार केली. पारेख म्हणून कुटुंब होते. त्याचा घरात मृत्यू झाला होता. महाराजांनी त्यावर फुली मारली. तिथे जाऊ नका म्हणून सांगितले. त्यांनी सुरतला नोटीस पाठवली आणि खंडणी मागितली. त्यांनी सुरत लुटली. लुटले म्हणजे लुटारू नाही, असे जयंत पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
तसेच, लुटारू घरे भरणारे असतात. महाराष्ट्र हा दगडधोंड्याचा महाराष्ट्र आहे. त्यावेळी महाराष्ट्रात एवढी संपत्ती नव्हती. सुरतमध्ये संपत्ती होती. त्यामुळे संपत्ती वाढवण्यासाठी हा हल्ला करणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी लूट केली. स्वतःच्या जनतेला जपणारा राजा होता. पण फडणवीस आता नरेटिव्ह सेट करत आहेत. पण हीच स्टाईल त्यांना मारक होत आहे. महाराजांनी दोन वेळा सुरत लुटली. त्यामुळे आजही आम्ही म्हणतो की, महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. पण सुरतेवर छापा मारून मिळवलेली संपत्ती महाराजांनी राज्यात आणली. ती संपत्ती त्यांनी राज्यासाठी वापरली. पण हे सांगायला फडणवीस घाबरत आहेत. कारण सुरत लुटली हा शब्द बोलण्याचं धाडस नाही. कारण याबद्दल अमित शहा आणि मोदी त्यांना आप कैसे बोल रहो हो? असे विचारतील, असा टोला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.