पोलीस कर्मचाऱ्याने सर्व्हिस रिवॉलव्हरने पत्नीला घातली गोळी
नांदेड : खरा पंचनामा
पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सर्व्हिस रिवॉलव्हरने आपल्याच पत्नीला गोळी घातली आहे. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये ही घटना घडली असून या हत्याकांडामुळे खळबळ पसरली आहे.
नांदेड शहरात आज सर्वत्र गणेश विसर्जन सोहळा सुरू होता. सर्वत्र पोलिस बंदोबस्तात गणपती विसर्जन शांततेत सुरू होते. त्यावेळी पोलीस अमलदार अफजल पठाण हे विमानतळ पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात कार्यरत आहेत. पठाण आपल्या घरी धनेगाव येथील आयडीयल कॉलनीत सायंकाळी सहा वाजता पोहोचले. पठाण यांनी आपल्या शासकीय बंदुकीतून आपल्याच पत्नीवर गोळीबार केला. या गोळीबारात पठाण यांच्या पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी अफजल पठाणला ताब्यात घेतले. दुसरीकडे पत्नीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पठाण यांनी असे का केले याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.