Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गांजा विक्री करणाऱ्या सराईतास अटक, १२ किलो गांजा जप्त ३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई : पोलिस अधीक्षक संदीप घुगे

गांजा विक्री करणाऱ्या सराईतास अटक, १२ किलो गांजा जप्त
३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई : पोलिस अधीक्षक संदीप घुगे



सांगली : खरा पंचनामा

सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या पिछाडीस असलेल्या एका हॉटेलजवळ गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून गांजा, एक दुचाकी, मोबाईल असा ३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यासीन शब्बीर मुजावर (वय ३२, रा. साईनाथनगर, कनारळ रोड, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक घुगे यांनी अंमली पदार्थ विक्री तसेच बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला अशा गुन्हेगारांना शोधून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार एक पथक गुन्हेगारांचा शोध घेत होते. 

पथकातील संतोष गळवे यांना कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या पिछाडीस असलेल्या एका हॉटेलजवळ मुजावर गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने त्या परिसरात सापळा रचला. संशयित दुचाकीवरून तेथे आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पोत्याची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये गांजा सापडला. त्याचे वजन १२ किलो भरले. त्याची बाजारात किंमत २.४० लाख रूपये आहे. त्याला अटक करून गांजा, दुचाकी, मोबाईल असा ३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सांगलीच्या नूतन पोलिस उपअधीक्षक एम. मंगला, शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, सागर होळकर, संदीप पाटील, विनायक शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, सचिन शिंदे, योगेश सटाले, संदीप कुंभार, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.