अवैध वाळू वाहतूक करणारे चार हायवा डंपर जप्त, तिघांना अटक
दीड कोटींचा मुद्देमाल जप्त, चकलांबा पोलिसांची कारवाई
बीड : खरा पंचनामा
जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षस भवन परिसरात रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार हायवा डंपर जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिली.
अखिल अल्बक्ष पठाण (रा. महार टाकळी), अंगत शामराव शिंगटे (रा. झापेवाडी, ता. शिरूर, जि. बीड), नजीर नसीर शेख (रा. शेकटा, ता. गेवराई, जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राक्षस भवन परिसरात रात्री अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती श्री. एकशिंगे यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यांनी पथकासह त्या परिसरात सापळा रचला होता.
त्या परिसरात पथकाला अवैध वाळू वाहतूक करणारे चार हायवा डंपर सापडले. ते जप्त करून तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोलीस हवालदार श्री. गुजर, श्री. खेत्रे, श्री. पवळ, श्री. घोंगडे, श्री. इंगोले, श्री. मिसाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.