Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईतल्या अभिनेत्री आणि मॉडेलचा छळ केल्याप्रकरणी ३ आयपीएस अधिकारी निलंबित प्रशासकीय आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ

मुंबईतल्या अभिनेत्री आणि मॉडेलचा छळ केल्याप्रकरणी ३ आयपीएस अधिकारी निलंबित
प्रशासकीय आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ



मुंबई : खरा पंचनामा

मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे.

आंध्र प्रदेश सरकारने पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अभिनेत्री कादंबरी जेठवानींच्या तक्रारीनंतर आंध्र प्रदेश सरकारने कारवाई केली. पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य तपास न करता कादंबरी जेठवानीला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप होता.

याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू (डीजी रँक), माजी विजयवाडा पोलिस आयुक्त क्रांती राणा टाटा (महानिरीक्षक दर्जा) आणि माजी पोलिस उपायुक्त विशाल गुन्नी (अधीक्षक दर्जा) यांचा समावेश आहे. तपासाअंती या अधिकाऱ्यांवर अभिनेत्रीचा छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला असून, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुंबईतील रहिवासी असलेल्या कादंबरी जेठवानी यांनी ऑगस्टमध्ये एनटीआरचे पोलीस आयुक्त एस. व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. त्यात त्यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, असे होते.

'विद्यासागर यांच्यासह उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी मला आणि माझ्या पालकांचा छळ केला. मला अटक केली आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईहून विजयवाडा येथे आणले. पोलिसांनी माझा अपमान केला आणि बेकायदेशीरपणे मला आणि वृद्ध पालकांना ताब्यात घेतले. कुटुंबाला ४० दिवसांपेक्षा जास्त काळ न्यायालयीन कोठडीत राहण्यास भाग पाडले," असा आरोप कादंबरी जेठवानी यांनी केला होता.

जेठवानी आणि त्यांच्या कुटुंबाला अडकवण्यासाठी जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप श्रीनिवास यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अनेक दिवस जामीन अर्ज दाखल करू दिला नाही. त्यानंतर आता आंध्र प्रदेश सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाचा आदेश जारी केला आहे.

"अहवालाचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आणि प्रकरणाची परिस्थिती लक्षात घेऊन, सरकार या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की प्रथमदर्शनी पुरावे अस्तित्वात आहेत आणि त्याच्या गंभीर गैरवर्तनासाठी आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाईची हमी देते," असे सरकारी आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात असेही समोर आले आहे की, पी. सीताराम अंजनेयुलू यांनी अभिनेत्रीच्या अटकेसाठी सूचना दिल्या होत्या. तर आधी एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. ३१ जानेवारी रोजी अटकेचे निर्देश जारी करण्यात आले असताना नंतर २ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.