Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाहनांच्या चॉईस, फॅन्सी क्रमांकाच्या शुल्कात वाढ

वाहनांच्या चॉईस, फॅन्सी क्रमांकाच्या शुल्कात वाढ



मुंबई : खरा पंचनामा

हौसेला मोल नसते असे म्हणतात ना. त्यामुळेच परिवहन विभागाने (आरटीओ) कार्यालयातून नवीन वाहनांसाठी चॉईस, फॅन्सी किंवा आवडीचा नंबर घेण्यासाठी आता अधिक खिसा हलका करावा लागणार आहे. कारण परिवहन विभागाने पुन्हा एकदा चॉईस नंबरच्या शुल्कात दुप्पट वाढ केली आहे. तब्बल नऊ वर्षानंतरही वाढ करण्यात आलेली आहे.

अनेक जण पसंतीच्या नंबरसाठी लाखो रुपये मोजतात. आरटीओ कार्यालयाकडून नंबरची नवीन मालिका सुरू केल्यानंतर चॉईस नंबरसाठी अर्ज मागविण्यात येतात. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो. यासाठी बंद लिफाफ्यात मूळ शुल्काव्यतिरिक्त अधिक रकमेचा धनाकर्ष जमा करावा लागतो. ज्याची रक्कम अधिक, त्याला तो नंबर दिला जातो. वाहनाला ठराविक नंबर मिळावा, यासाठी आग्रही असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परिवहन विभागाने २०१३ मध्ये फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीन ते चारपट वाढ केली होती. आता पुन्हा शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

परिवहन विभागाने २०१३ मध्ये चॉईस नंबरच्या शुल्कात वाढ केली होती. त्यानुसार नागपूर, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत चारचाकी वाहनांसाठी ०००१ हा नंबर घेण्यासाठी ४ लाख, तर इतर जिल्ह्यांत याच नंबरसाठी ३ लाख रुपये शुल्क लागत होते. आता पुन्हा या नंबरसाठी ९ जिल्ह्यांत हाच नंबर ६ लाखांना, तर इतर जिल्ह्यांसाठी हा नंबर ५ लाखांसाठी करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.