'बदला पुरा' मुंबईत देवेंद्र फडणवीसांचं हातात रिव्हॉल्व्हर घेतल्याचं पोस्टर!
सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल म्हणाल्या, 'मिर्झापूर टिव्ही सिरिजमध्येच...'
पुणे : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे, अशातच मुंबईत पोस्टर वॉरही सुरू झाले आहे.
मुंबईतील कलानगरी असलेल्या वांद्रेसह अनेक भागात बदलापूर नावाची पोस्टर्स लावण्यात आली आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले असून, त्यावर 'बदला पुरा' असं लिहण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या पोस्टरवरती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. त्यावर आज पुण्यात माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला आहे. देवेंद्रजी असे बॅनर लहान मूल बघतील काय म्हणतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मला सगळ्यात जास्त दुःख एका गोष्टीचं झालं. देवेंद्रजी बंदूक दाखवत आहेत. हा बंदुकांचा देश नाही. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा देश आहे, आणि राज्य आहे. त्यामुळेत देवेंद्रजींनी तिथून आम्हाला बंदुका दाखवल्या तर आम्ही अथून देवेंद्रजींना संविधान दाखवू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी असे बंदूक घेतलेल बॅनर लहान मूल बघतील तेव्हा काय म्हणतील, अक्षय शिंदे एन्काऊंटर वरून देवेंद्र फडणवीस यांचे बंदूक धरलेले पोस्टर वायरल होत आहेत. त्यावर आज सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या महिलेसाठी हे फार धक्कादायक आहे. कराण जी लहान मुलं ते पोस्टर बघतील, त्यांच्यावर काय संस्कार होतील. या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. बस ते मिर्झापूर टिव्ही सिरिज मध्येच या गोष्टी चालतात. बॉस हे वास्तव आहे. हा शाहू, फुले, आंबेडकरांचा देश आहे, असंही सुप्रिया सुळेंनी पुढे म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.