Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्लॅन? पवार-ठाकरेंना चकवा देत भाजप-शिवसेना टाकणार गुगली

अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्लॅन? 
पवार-ठाकरेंना चकवा देत भाजप-शिवसेना टाकणार गुगली



मुंबई : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाच्या चर्चा होत आहेत. यासाठी बैठकाही घेतल्या जात आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर या आठवड्यात येणार आहेत.

यावेळी महायुतीच्या नेत्यांसोबत जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगण्यात येतंय. पण महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट अधिक जागांसाठी आग्रही असल्यानं अजित पवार यांना कमी जागा वाट्याला येतील. अशा परिस्थितीत तडजोड करायची की वेगळं लढायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर असेल. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवार यांची कोंडी करून त्यांना बाहेर पडण्यासाठी अप्रत्यक्ष रणनीती आखली जात असल्याचं म्हटलं जातंय.

अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्यासाठी वातावरण तयार करण्यात येत असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. विधासनभा निवडणुकीआधी महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अशा वेळी जर अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर भाजप आणि शिंदे गटाला जास्त जागा मिळतील अशी रणनीती आखली जात असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

भाजप आणि शिवसेना विरुद्ध अजित पवार असे दोन गट महायुतीत पडल्याचंही चित्र सध्या दिसतंय. शिंदे गटाने मविआतून बाहेर पडताना सर्वाधिक टीका अजित पवार यांच्यावरच केली होती. अजित पवार निधी देत नाहीत असं कारण सांगत सत्तेतून बाहेर पडण्याचं समर्थन केलं होतं. पण त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांना भाजपने सोबत घेतल्यानं शिंदे गटाची अडचण झाली.

शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आपलं कधी पटलं नाही, कॅबिनेटला मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य केल्यानंतर वादाला तोंड फुटलं होतं. त्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर आक्षेपार्ह विधान केलं. यावर अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसंच भाजप आमदार नितेश राणे यांच्या मुस्लिमांबद्दलच्या विधानांवरही आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने यासंदर्भात दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडे तक्रार करू असा इशाराही दिला. पण या सगळ्यामागे अजित पवार गटाची कोंडी करण्याची छुपी रणनीती असल्याचं मानलं जातंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.