Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता शाळेतील पोरंही... चौथीच्या विद्यार्थ्यांनाही करायला लावताहेत भाजप प्रवेश!

आता शाळेतील पोरंही... चौथीच्या विद्यार्थ्यांनाही करायला लावताहेत भाजप प्रवेश!



अहमदाबाद : खरा पंचनामा

गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील आयपीएस स्कूलच्या मॅनेजमेंटने चौथीच्या विद्यार्थ्यांना मेसेज पाठवत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेचा भाजप नेते महेंद्र पटेल यांच्याशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुजरातमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे सदस्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर होत असल्याच्या घटना वाढत असून आता आणखी एका शाळा चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.

10 सप्टेंबर रोजी सुरेंद्रनगरच्या कुमारी एमआर गार्डी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कथितरित्या भाजपचे सदस्यत्व देण्यात आले होते. दरम्यान याबाबतचे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

शाळेच्या मॅनेटमेंटने "GUJ 4C IPS" नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक लिंक शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, "आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य मोहिमेत तुमचे सहकार्य मिळावे ही विनंती."

दरम्यान हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने याबाबत मौन बाळगले आहे. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचेही टाळले. शाळेशी संबंधित असेलेले भाजप नेते महेंद्र पटेल यांनीही या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

गुजरात भाजपचे प्रमुख आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये पक्षाची 'सदस्यत्व मोहीम 2024' सुरू केल्याची माहिती आहे. यामध्ये राज्यात भाजपचे दोन कोटी प्राथमिक सदस्य करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले होते.

Vibes of India ने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला, विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात त्यांच्या पालकांचे मोबाईल फोन आणण्याची सूचना देण्यात आली होती. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या फोनवरून भाजप सदस्य म्हणून नोंदणी करण्यापूर्वी राष्ट्रध्वज देत त्यांचे फोटो काढण्यात आले होते.

शाळेचे मुख्याध्यापक मुकेश निमावत यांनी हे सर्व आरोप फेटाळत दावा केला की, सरकारी शैक्षणिक ॲप डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे फोन आणायला सांगितले होते. संस्थेने पुढे असा आरोप केला आहे की कोणीतरी मुद्दाम चुकीची माहिती पसरवत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.