Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गणेश विसर्जनाच्या तोंडावर पुणे हादरले! वाळू व्यावसायिकावर गोळीबार

गणेश विसर्जनाच्या तोंडावर पुणे हादरले! 
वाळू व्यावसायिकावर गोळीबार



पुणे : खरा पंचनामा

गेल्या काही महिन्यांपासून सतत होणाऱ्या गुन्हेगारीत आता आणखी भर पडली आहे. पुण्यात उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी आज एका वाळू व्यावसायिकावर दोन ते तीन जणांनी गोळीबार केला आहे. यामध्ये व्यावसायिक जखमी झाला आहे. दरम्यान ही घटना पुण्यातील गंगाधाम परिसरात घडली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गंगाधाम येथे वाळू व्यावसायिकावर 2 ते 3 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळावरून पळून गेले. यावेळी त्यांनी 2 राऊंड फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान पीडित वाळू व्यावसायिकावर झालेला हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाळू व्यावसायिकाला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.