Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गणेशोत्सवात पोलिसांना वर्दीमध्ये नाचण्यास मनाई

गणेशोत्सवात पोलिसांना वर्दीमध्ये नाचण्यास मनाई



मुंबई : खरा पंचनामा

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबई आणि पुण्यातील अनेक मोठ्या मंडळांसह राज्यभरात बाप्पाच्या आगमनास सुरुवात झाली आहे. गणरायाचं आज वाजत गाजत, ढोल ताश्याच्या गजरात आगमन होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते आणि राजकारण्यांच्या घरी बाप्पाचे आगमना झाले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले आहे. हा गणेशोत्सव उत्साहात आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावा यासाठी राज्यातील पोलिस सतर्क आहेत.

मुंबईत गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि जल्लोषात सजारा केला जातो. बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक असो किंवा विसर्जन मिरवणूक लहान मोठ्यांपासून अनेकांना नाचण्याचा मोह आवरत नाही. यात अनेकदा पोलिस कर्मचारी देखील सहभाही होतात. परंतु यंदा मुंबई पोलिस दलातील कर्मचारी गणेशोत्सवादरम्यान नाचताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी सार्वजनिक कार्यक्रमात मुंबई पोलिसांना नाचण्यापासून मनाई केली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबई पोलिसांना नाचण्यापासून मनाईचे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवादरम्यान पोलीस कर्मचारी वर्दीमध्ये नाचताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. गणेशोत्सवातील सुरक्षा आणि बंदोबस्त आढावा घेण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त फणसळकर यांनी ही ताकीद दिली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 6 सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था आणि पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी एक बैठक पार पडली. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या बैठकमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना नाचण्यास मनाई केली आहे. मुंबईमध्ये पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान वर्दीमध्ये नाचू नये, कोणताही पोलीस कर्मचारी नाचताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी तंबी त्यांनी दिली. पोलिसांनी गणवेशाचा आदर राखावा असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.